ही घटना दिल्लीच्या डाबरी भागातील आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, महिला आणि आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून महिलांवरील गुन्हे वाढताना दिसत आहे.काही दिवसापुर्वी दिल्लीत प्रियकारने प्रेयसिचा निघृण खून केल्याची घटना घडली होती. या घटनेवरुन दिल्लीत महिला सुरक्षित नसल्याचा बाब समोर आली. आता पुन्हा अशीच एक घटना दिल्लीच्या डाबरी भागातून समोर आली आहे.
भरदिवसा एका 42 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात करण्यात आल्याची घटना घडली असून त्यानंतर आरोपीने स्वत:ही घराच्या छतावर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली मृत रेणू आणि आरोपी आशिष एकमेकांना आधीपासून ओळखत होते. दोघही एकाच जीममध्ये जात असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय…….
हे संपूर्ण प्रकरण दिल्लीतील डाबरी भागातील आहे. रेणू असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष हा महिलेच्या घराजवळ राहत होता. रेणू आणि आरोपी आशिष यांची काही वर्षांपूर्वी एका जिममध्ये भेट झाली होती. दोघं नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी द्वारकाचे डीसीपी हर्षवर्धन यांनी सांगितले की, ४२ वर्षीय महिलेच्या हत्येची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. रेणू असे या महिलेचे नाव असून ती गृहिणी असून ती आपल्या कुटुंबासह वैशाली परिसरात राहत होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेतला असता आरोपीची ओळख पटली, त्यानंतर आम्ही आरोपीच्या घरी पोहोचलो. मात्र, आरोपीने याआधीच घराच्या टेरेसवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
हत्येचं कारण काय?…..
या प्रकरणी पोलीस कसून तपास करत असून रेणू आणि आशिषचे फोन तपासण्यात येत आहेत. दोघांच्या नात्याबद्दल अनेक प्रकाराच संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, आशिषची हत्या आणि आत्महत्येमागील कारण काय, याबाबतचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांचे पथक दोघांच्या नातेवाईकांची चौकशी करत आहे. एका स्थानिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, दोघांमध्ये जवळचे संबंध होते आणि महिलेच्या कुटुंबीयांना ते आवडत नव्हते. रेणूला तिची आशिषसोबतची मैत्री संपवायची असावी आणि ही बाब आशिषला मान्य नसल्याने त्याने आधी रेणूची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली, अशी आणखी एक शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.