Viral Video:असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. जेव्हा तरुण तरुणी प्रेमात पडतात त्यांना सगळं जग सुंदर दिसतं. आता या प्रेमाला लग्न बंधनात अडकविण्याची वेळ येते.
तेव्हा मात्र कुटुंबासमोर आपल्या प्रेमाती कबुली दिली जाते. अनेक वेळा पालकांकडून या प्रेमाचा स्विकार होतो आणि मुलांचं लग्न थाटामाट्यात लावून दिलं जातं. पण काही वेळा ही कुटुंब खलनायिकेचा भूमिकेत जातात. त्यांचा अनेक कारणाने मुलांच्या प्रेमाला विरोध असतो.
प्रेमाला विरोध हा कधी जातीतून होतो तर कधी गरीब श्रीमंतीचा भेद…यातून समाजात ऑन किलिंग सारख्या घटना घडतात. पालक तरुणी असो किंवा तरुण यांच्यावर बळजबरीने लग्न लावायचा प्रयत्न करतात. अशावेळी काही जण पालकांच्या विरोध झुगारू शकतं नाही. पण काही कपल हे पालकांच्या विरोधाला झुगारून घरातून पळून जातात.
अशाच एका कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण तरुणीला घरातून पळून घेऊन जाण्यासाठी आला असतो. ती तरुणी घराच्या विरोधात बॅग वगैरे घेऊन पळत त्या तरुणाकडे येते. तो तरुण तिची बाइकवर वाट पाहत असतो. पण ऐन वेळी त्याची बाइक काही केल्या सुरु होतं नाही. त्या तरुणीचे घरचे काठी घेऊन तिच्या पाठलाग करत असतात. आता काय करायचं बाइक सुरु तर होतं नाही आहे.
अशातच त्या दोघांचं लक्ष तिथे असलेल्या ड्रमवर गेलं. प्रसंग बघता तो तरुण तरुणीला ड्रममध्ये लपवतो. आता तो परत बाइक सुरु करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात तरुणीचे घरचे काठ्या घेऊन त्याला मारायला आले असतात. तो बाइक तिथे सोडून पळ काढतो.
सोशल मीडियावर 55 सेकंदाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी प्रश्नात पडले आहे की, तरुणी गेली तरी कुठे? हा व्हिडीओ ट्वीटर म्हणजे X वर Bio dekho या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खरा आहे की, रीलचा एक भाग आहे, हे काही स्पष्ट होतं नाही.
हे पण वाचा
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.