प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल :- ३०/०७/२०२३ रोजी करण्यात आला. या सात दिवसाच्या सप्ताहात एरंडोल शहरातील सामाजिक कार्यकर्ते,प्रशासकीय अधिकारी,डॉक्टर,बाहेर गावाहून आलेले मान्यवर,समाजसेवक,वृक्षप्रेमी प्रतिष्ठित नागरिक यांनी निसर्ग सप्ताह मध्ये आपल्याला हवे असलेली रोपे बुक करून मैत्री सेवा फाउंडेशनच्या या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.व सर्व बुक झालेली रोपे आज ३०/०७/२०२३ रोजी धरणगाव चौफुली येथे स्टॉल लावून वितरित करण्यात आले व एनवेळेवर सुद्धा ज्यांना रोपे हवी असतील त्यांना पण आवश्यकतेनुसार वितरित करण्यात आली.
याप्रसंगी स्टॉल चे उदघाटन एरंडोल पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे व सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी एरंडोल-पारोळा विधानसभेचे आमदार चिमनराव पाटील व जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी भेट देत दिली व मैत्री सेवा फाऊंडेशन च्या कार्याचे कौतुक केले तसेच वृक्ष लागवडीसाठी जनतेला ही आव्हान केले.या उपक्रमात माऊली क्लासेस चे संचालक गोरक्षनाथ महाजन यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी प्रेरित करत त्यांच्या सोबत जवळपास २०० वृक्षांचेरोपण करत व संगोपनाची जबाबदारी घेत या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.
तसेच मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे या सप्ताहात एकूण १५०० वृक्षांचे शासकीय दरात विक्री करण्यात आली यात नीम-३००, बांबू-२००,सिताफळ-३००, गुलमोहर-२५०,आवळा-२५०, शिसम-२००, असे एकूण १५०० रोपे होती , नागरिकांकडून रोपे लागवडीचे व संगोपनाचे प्रतिज्ञापत्र ही घेण्यात आले. निसर्ग सप्ताह उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
हे पण वाचा
- मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दोघांना डंपरची जोरदार धडक,दुचाकीस्वार तरुण ठार तर मित्र गंभीर जखमी.
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.