निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- शिक्षक सेनेच्या कल्याण तालुक्याचे माजी संस्थापक अध्यक्ष अनिल काकडे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रावेर विधानसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.अनिल काकडे पञकारिता करत असतांना ते शिवसेनेचे कार्य करू लागले सामाजिक आणि राजकीय काम करत असतांना सहायक पोलिस आयुक्तांच्या पोलिस जनता संपर्क समितीच्या माध्यमातून शहरातील शांततेसाठी त्यांनी उपक्रम राबविले. व्यसनमुक्तीचे ही अनेक उपक्रम त्यांनी राबवले.
२००१साली ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्य झाले.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आणि कल्याणच्या रहिवासी आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या शिक्षण मंडळाच्या सभागृहाला नांव देऊन त्यांनी छोटेसे स्मारक उभे केले. त्याचवेळी रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारात आनंदीबाई जोशी यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यासाठी त्यांनी प्रदिर्घ लढा दिला.
शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या शिक्षक सेनेची त्यांनी तालुक्यात स्थापना केली. शिक्षकांच्या विविध समस्या सोडवल्या . अनिल काकडे यांच्या निष्ठेची दखल घेत शिवसेनेने त्यांची रावेर विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली आहे.याबद्दल नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
हे वाचलंत का ?
- ViralVideo:पतीने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत भररस्त्यात रंगेहात पकडले, पतीला आला संताप, पुढे काय झालं पहा व्हिडिओ.
- मुख्याध्यापिकेला रग्गड पगार तरीपण पैशांचा मोह आवरेना; प्रसूती रजा मंजुरीसाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.
- अमळनेर तालुक्यात ३२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा.
- पंचायत समिती कडुन नागरीकांना होणाऱ्या गैरसोयी तातडीने थांबवा – आमदार मा.अमोलदादा पाटील
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.