एरंडोल वि.का.सोसाच्या अध्यक्षपदी विजय (अण्णा) महाजन तर उपाध्यक्षपदी निर्मलाबाई महाजन यांची बिनविरोध निवड.

Spread the love

एरंडोल l प्रतिनिधी एरंडोल :- येथील एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय पंढरीनाथ महाजन यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती निर्मलाबाई देविदास महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष दुर्गादास महाजन व उपाध्यक्ष पंडित सूर्यवंशी यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

अध्यक्षपदासाठी विजय पंढरीनाथ महाजन यांचा तर उपाध्यक्षपदासाठी श्रीमती निर्मलाबाई देविदास महाजन यांचे एकमेव उमेदवारी अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी अनुजा बाविस्कार अभिजित पाटील यांनी काम पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव बापू पाटील व कर्मचा-यांनी सहकार्य केले.विजय महाजन आणि निर्मलाबाई महाजन यांची निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करून विजयोत्सव साजरा केला.

भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,देविदास महाजन,रवींद्र महाजन, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांचेसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी अध्यक्ष विजय महाजन यांचा सत्कार केला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील,डॉ.राजेंद्र चौधरी,युवा उद्योजक विजय जाधव,माजी नगरसेवक योगेश महाजन,रुपेश माळी, डॉ.सुरेश पाटील, जगदीश ठाकूर डॉ.फरहाज बोहरी,बबलू चौधरी,माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन संस्थेचे संचालक माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,नितीन महाजन,ईश्वर पाटील, योगराज महाजन, राजधर महाजन,वामन धनगर,रघुनाथ ठाकूर,सुमनबाई माळी,रमेश महाजन,शांताराम महाजन

पहा संपूर्ण निवडीच्या व्हिडिओ

https://www.youtube.com/@zunjaarnews

Like share and Subscribe our youtube Channel

आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ????

इच्छाराम महाजन, सुरेश देशमुख,ज्ञानेश्वर पाटील, चिंतामण पाटील,एजाज अहमद हाजी जुगनसाहेब,जावेद मुजावर,युवराज महाजन, मन्साराम महाजन,भगवान महाजन,अशोक जोशी यांचेसह सावता माळी गणेश मंडळाचे पदाधिकारी,महात्मा फुले हायस्कूलचे पदाधिकारी व कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.एरंडोल विविध कार्यकारी सहकारी संस्था तालुक्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था असून शेतक-यांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून
देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष विजय महाजन यांनी सांगितले.

टीम झुंजार