विद्युत वितरण पेटीचे कट आउट तोडून नुकसान व चोरी करणारे चोरट्यांना पकडण्यात यश,सहाय्यक अभियंता दमाडे व निंभोरा पोलीस यांची विशेष कामगिरी.

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

रावेर : – तालुक्यातील विवरे शिवारात
रोहित्र वरील वितरण पेटीचे कट आउट फोडून चोरी करणारे चोरट्यांना पकडण्यास विद्युत सहाय्यक अभियंता अमृत दमाडे व निंभोरा पोलीस यांनी विशेष कामगिरी केल्याने विवरा ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


या बाबत असे की दिनांक 28 रोजी विवरा शेती शिवारात रस्त्यालगत असलेल्या विकास लक्ष्मण चौधरी यांच्या शेतातील रोहित्र क्रमांक 0655484, 63 केव्हीए यावरून वितरण पेटीतील कट आउट तोडून चोरी करणारे चोरी करत असताना याबाबत समजताच संध्याकाळी साडेसहा वाजे दरम्यान विद्युत कंपनीचे सहाय्यक अभियंता अमृत दमाडे हे शेतकरी यांच्या शेतातील विद्युत तारा व रोहित्र आईल चोरी होत असल्याने त्या संदर्भात चौकशी करत असताना त्यांना रस्त्यावर कट आउट फोडण्याचा आवाज आल्याने त्यांनी लागलीच रोहित्रा कडे जाऊन पाहणी केली असता तीन चोरटे चोरी करत असताना व नुकसान करत असताना दिसून आल्याने त्यांनी तिघे चोरट्यांना पकडण्या चा प्रयत्न केला असता त्यापैकी एका चोरास पकडण्यात त्यांना यश आले .

मात्र दोन चोरटे फरार झाले याबाबत पकडलेल्या चोरास निंभोरा पोलीस ठाण्यात अभियंता दमाडे यांनी व त्यांचे सहकारी निलेश पालक, रोहन महाजन ,मज्जित तडवी, निखिल महाजन, पंकज पिपळे व पवन पाटील व ग्रामस्थांनी चोरास पोलिसांच्या स्वाधीन करून चोरी करून कट आउट फोडण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल निंभोरा पोलीस ठाण्यात दमाडे यांनी तक्रार दिल्याने लागलीच निंभोरा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश धुमाळ फौजदार राका पाटील तसेच पोलीस किरण जाधव, रशीद तडवी, ना.पो.अविनाश पाटील चालक अशरब शेख यांनी फरार झालेल्या चोरट्यांना पकडण्यात मोठ्या शितापीने प्रयत्न करून चोरट्यांना पकडण्यास यश मिळवले.


याबाबत आरोपी अमजद राजू तडवी रा. कोरपावली, भूषण मिलिंद अडकमोल रा. महेलखेडी, चंद्रकांत उर्फ चंदू पंढरी जावरे यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गु.रं. न. 0151/2023 भादवि कलम 379, 511, 427 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल क्रमांक एम एच 19 एन 34 92 चॅम्पियन गाडी फोर एस दहा हजार रुपये किमतीची जप्त करण्यात आली आहे.
या आधी देखील विवरे शेती शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील डीपीचे नुकसान व विद्युत तारा चोरी झाले असल्याने निंभोरा पोलीस ठाण्यात या आधी देखील एक दिवस अगोदरच गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि.गणेश धुमाळ व पोलीस करीत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार