सकल मराठा समाज न्याय समिती संयोजकांच्या वतीने आयोजन.
भडगाव l प्रतिनिधी :- तालुक्यातील गोंडगाव येथील कु. कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव तहसिल कार्यालयावर सकल मराठा समाज न्याय समिती संयोजकांमार्फत दि. ४ रोजी ११ वाजेपासुन मुकमोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनाच्या प्रती भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभागीय प्रांत अधिकारी, भडगाव पोलीस निरीक्षक आदिंना देण्यात आलेल्या आहेत.
या निवेदनावर सकल मराठा समाज न्याय समिती संयोजक यात लक्ष्मण गोविंदा पाटील घुसर्डी, डाॅ. आर एस मराठे भडगाव, शिवाजी नामदेव मराठे तारखेडा, चिंतामण बाजीराव पाटील मांडकी, मोतीलाल भिला नरवाडे, विठ्ठल नामदेव मराठे भडगाव, काशिनाथ वामन नरवाडे भडगाव, राजेंद्र पांडुरंग पाटील तारखेडा आदिंच्या सहया आहेत.
भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, गोंडगाव ता. भडगाव येथील तीसरीच्या वर्गात शिकणारी ९ वर्षीय बालिका कु. कल्याणी संजय पाटील हिच्या अमानुष कृत्य करुन खुन करणार्या आरोपीस व त्याला मदत करणार्या सह आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देउन फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच त्यांनी वापरलेल्या मोबाईल व साधनांची पडताळणी करण्यात यावी. या केसचे कामी विधीतज्ञ अँड. उज्वल निकम यांची नेमणुक करावी. या केसचे काम ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपींना तात्काळ शासनाकडुन पीडीत बालकेस न्याय मिळवुन दयावा.
यासाठी दि. ४ रोजी भडगाव नगर परीषद मेन रोड पासुन ते भडगाव तहसिल कार्यालय असा मुकमोर्चा सकाळी ११ वाजेपासुन शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार आहे. व ठिय्या आंदोलनही करण्यात येईल.तरी आपल्या स्तरावरुन कार्यवाही व्हावी. असेही निवेदनात शेवटी नमुद केलेले आहे. यावेळी सकल मराठा समाज न्याय समिती संयोजकांचे इतरही वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती देण्यात आली.
हे पण वाचा
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.