जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मानमरातब वाढेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आध्यात्मिक आवड वाढेल.
वृषभ :-
स्थावर मालमत्तेच्या कामातून लाभ होईल. घरात चांगल्या बातम्या येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. इच्छापूर्तीचा दिवस.
मिथुन :-
दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल. अडचणीतून मार्ग निघेल. दिवस कार्यपूर्तीत जाईल. गोष्टी मनासारख्या घडून येतील.
कर्क :-
मानसिक चिंतेला बाजूला सारावे. स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना काढून टाका. लपवाछपवीची कामे करू नका. बदलाची अपेक्षा कराल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका..
सिंह :-
मनोवांच्छित लाभेल. चर्चेतून कोंडी फुटेल. वाहन जपून चालवावे. भविष्या संदर्भातील एखादी योजना आखाल. निराशेतून मार्ग काढाल.
कन्या :-
नवीन सोयी कराल. कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाईल. व्यापारीवर्ग खुश राहील. धावपळीतून यशाचा मार्ग खुला होईल. प्रलंबित कामे पूर्ण करावीत.
तूळ :-
नवीन गोष्टीत रमून जाल. व्यवहार सावधानतेने करावेत. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कामात सुलभता येईल.
वृश्चिक :-
टोकाची भूमिका घेऊ नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो. काही कामे कमी श्रमात पार पडतील. हातातील कामातून समाधान लाभेल.
धनू :-
आज जोडीदार तुमच्यावर खुश राहील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदाराशी सलोखा वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. बोलण्यातील व्यर्थता टाळावी.
मकर :-
कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामाचा उरक वाढेल. उगाच वादात पडू नका. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.
कुंभ :-
आज दिवसभर मौजमजा कराल. मित्रांचा फड जमवण्याचा प्रयत्न कराल. करमणूक प्रधान दिवस राहील. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. विनाकारण तर्क-वितर्क करू नका.
मीन :-
कौटुंबिक बाबीत यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. हितशत्रू परास्त होतील. जोडीदाराच्या भावना समजून घ्या.
हेही वाचलंत का ?
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






