जळगाव :- येथे एक दुर्दैवी घटना समोर आलीय. भरधाव डंपरने धडक दिल्याने आईच्या डोळ्यासमोर ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल तनयजवळ घडली.प्रेरणा योगेश नेमाडे (वय-४) रा.माऊल नगर, जळगाव असे मयत चिमुकलीचे नाव आहे. तर या अपघातात तिची आई दक्षता ही किरकोळ जखमी झाली आहे.
जळगाव शहरातील माऊली नगरातील रहिवासी असलेले योगेश नेमाडे यांची मुलगी प्रेरणा (वय ४) हि जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता नेमाडे तिला स्कूटीने घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलगी प्रेरणाला स्कूटीने घरी घेवून जात असतांना राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनयजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकली प्रेरणा गंभीर जखमी झाली.
जखमी प्रेरणा हिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.