भडगाव l प्रतिनिधी :- तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करुन निघृण हत्या केल्याबद्दल जाहीर निषेधाचे निवेदन मुस्लिम मंच मार्फत भडगाव तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
या निवेदनावर रफिक सर, इम्रान अली सय्यद, हाजी जाकीर कुरैशी,युनूस खान, सोनू खाटीक, हाजी अल्ताफ खाटीक शकील मेंबर, इद्रीस कुरैशी, नासिर खान पत्रकार अबरार मिर्झा,जावेद शेख, स्लाउद्दीन शेख एडवोकेट.संजीदा शेख,मोहसीन खान, रमजान खान यांचे सहया आहेत.
तहसीलदार मुकेश हिवाळे व भडगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करुन निघृण हत्या केल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त केला आहे. पुरोगामी महाराष्टाृला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याने केलेल्या पाशवी , अमानवीय कृत्य केल्याबद्धल अशा नराधमास भर चौकात फासावर चढवावे. जेणेकरुन असे अमानवीय कृत्य करण्याची हिम्मत कुणाची होणार नाही. व त्या निरागस , निरपराध बालिकेस न्याय मिळावा. असेही निवेदनात शेवटी म्हटलेले आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.