२४ वर्षीय प्रियकर व ३६ वर्षीय विवाहित प्रेयसी यांचे होते अनैतिक संबंध,पती अनैतिक संबंधात होता अडथळा.
शिकारीच्या बहाण्याने जंगलात नेऊन तरुणाने विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर त्याने मृतदेह जंगलातच पुरला होता
नवी मुंबई : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केल्याचा प्रकार शनिवारी नवी मुंबईत उघडकीस आला आहे. नेरळ पोलिसांनी शनिवारी घरातील रंगारी आणि मयत तरुणाच्या पत्नीला अटक केली आहे. ऋषिकेश तुपे (२४) आणि अरुणा मुरबे (३६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. यासंदर्भात नेरळचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी माहिती दिली.
सचिन मुरबे (३८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो कर्जत तालुक्यातील देवपाडा येथे रिक्षा चालक म्हणून काम करत होता. अरुणाने पती सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार १५ जुलै रोजी नेरळ पोलिस ठाण्यात दाखल केली होती.सचिनचा मित्र आणि दूरचा नातेवाईक असलेला ऋषिकेश अरुणासोबत तक्रार दाखल करायला आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना हवालदार प्रवीण लोखंडे यांना माहिती मिळाली की, ऋषिकेश आणि सचिन देवपाडा गावातील आरी जंगलात शिकारीसाठी गेले होते, त्यानंतर सचिन बेपत्ता झाला.ऋषिकेशने त्याच्या शिकारीच्या रायफलने सचिनची हत्या केल्याची कबुली दिली.
त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह जंगलात पुरला आणि त्याचे दोन मोबाईल नाल्यात फेकून दिले. सचिनची कबर खोदण्यासाठी वापरलेल्या कुदळीचे भागही त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकली” असे पोलिसांनी सांगितले.
सचिनला जिथे पुरलं, ती जागा पाहण्यासाठी ऋषिकेशला आरी जंगलात नेण्यात आले. कर्जतच्या कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत सचिनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो जेजे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.” अशी माहितीही सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली.
हे पण वाचा
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.
- धुमधडाक्यात आली वरात, डी जे वाजवण्यावरून झाला वाद, लग्नाचा आनंद क्षणात दुःखाच्या सागरात बुडाला, लग्नात असं काय घडलं?