जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे.
वृषभ :-
आर्थिक आवक वाढेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. मेहनतीला पर्याय नाही. यश विलंबाने पदरात पडेल.
मिथुन :-
आवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा. आज प्रेमाची अनुभूति येईल. मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. नकारात्मक विचार सोडून द्यावेत.
कर्क :-
मनाची चंचलता आवरावी. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. वरिष्ठांना नाराज करू नका. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाच लपवाछपवी करू नका.
सिंह :-
तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. अथक मेहनतीचे चांगले फळ मिळेल. अनुभावातून धडा घ्यावा. मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका. धार्मिक अनुष्ठानात दिवस घालवावा.
कन्या :-
सामाजिक बांधीलकी जपावी. तुमच्याकडील कलेचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांना सांभाळावे लागेल. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ :-
गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात. वादामुळे मन खिन्न होऊ शकते. इतरांवर विसंबून राहू नका.
वृश्चिक :-
मुलांशी वाद होऊ शकतो. भावनिक घटना घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे. घाईगडबड टाळावी. अचानक धनलाभाची शक्यता.
धनू :-
घरातील वातावरण संमिश्र राहील. नवीन ओळखी वाढतील. जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. व्यावसायिक क्षेत्रातून लाभ होईल. भागीदारीतून नफा कमवाल.
मकर :-
कामासाठी बाहेर राहावे लागेल. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. घराबाहेर बेसावधपणे वागू नये. कामाचा बोजा वाढू शकतो. समस्येतून मार्ग निघेल.
कुंभ :-
सामाजिक कामात सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ टाळावी. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मुलांमुळे घर खेळकर राहील. करमणुकीवर भर द्यावा.
मीन :-
जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. मनातील गैरसमज दूर होतील. आर्थिक चिंता मिटेल. मन प्रसन्न राहील. प्रलोभनापासून दूर राहावे.
हेही वाचलंत का ?
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.