अमळनेर:- तालुक्यातील लोणचारम येथे ३९ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाच्या नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना दिनांक ४ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणचारम येथील शेतकरी संदीप प्रकाश पाटील (वय ३९) याने दिनांक ४ रोजी सकाळी ८ वाजेच्या आधी राहत्या घरी बेडरूममध्ये उभ्या भिंतीच्या कडीला दोरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यास उतरवत अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. चुलतभाऊ विवेक पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.
सदर शेतकऱ्याच्या पश्चात वडील, पत्नी, व ६ वर्षाची मुलगी असून त्यांच्याकडे ५ बीघे कोरडवाहू शेती होती. तसेच त्यांच्यावर असलेल्या गृहकर्ज, उसनवारी व इतर कर्जामुळे ते गेल्या काही दिवसापासून नैराश्यात वावरत असल्याची माहिती मिळाली आहे. व त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.