भडगांव l प्रतिनिधी:- तालुक्यातील गोंडगाव या गावी आठ वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करून कुट्टीच्या ढिगाराखाली दाबून निर्दयीपणे हत्या करणाऱ्या नराधमास कोठारात कठोर कारवाई करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून या खटल्यासाठी ऍडव्होकेट उज्वल निकम यांची नियुक्ती करून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी यासाठी भडगाव शहर तसेच
तालुक्यातून सर्व व्यापारी असोसिएशन, किराणा असोसिएश, हातमजूर, हॉटेल असोसिएशन,सलून असोसिएशन,पान टपरी व्यावसायिक,सोनार असोसिएशन,ऑटोमोबाईल असोसिएशन,इलेक्ट्रॉनिक व हार्डवेअर असोशियन, कापड असोशियन व सर्व ग्राहक सेवा संघ अश्या सर्व व्यापारी तसेच दुकानदार युनियन यांनी स्वयंम स्फुर्तीने आपापले व्यवसाय
तसेच दुकाने बंद ठेवून या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध केला व भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी व्यापारी संघटना पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हे पण वाचा
- ViralVideo:पतीने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत भररस्त्यात रंगेहात पकडले, पतीला आला संताप, पुढे काय झालं पहा व्हिडिओ.
- मुख्याध्यापिकेला रग्गड पगार तरीपण पैशांचा मोह आवरेना; प्रसूती रजा मंजुरीसाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.
- अमळनेर तालुक्यात ३२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा.
- पंचायत समिती कडुन नागरीकांना होणाऱ्या गैरसोयी तातडीने थांबवा – आमदार मा.अमोलदादा पाटील
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.