Viral Video: एक तरुण पोलिसांच्या समोर भरधाव वेगात बाईकचे एक चाक हवेत उचलून धोकादायक व जीवघेणा बाईक स्टंटच्या व्हिडिओ व्हायरल

Spread the love

Viral Video: सोशल मीडियावर धोकादायक स्टंट करणाऱ्याचा जणू ट्रेंडच सुरु आहे. शिवाय इंटरनेटवर दररोज एक तरी व्यक्ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असतो. वाहनांची गर्दी असणाऱ्या रस्त्यांवर स्टंट करतानारांचे अनेक व्हिडिओ तुम्ही याआधीही पाहिले असतील.पण सध्या एका तरुणाच्या स्टंटचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पोलिसांनाही घाबरत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने धावत असताना हा एक तरुण बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना राग अनावर झाला असून ते रस्ते सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक तरुण रस्त्यावर धोकादायक बाईक स्टंट करत आहे. तो समोरून बाईक हवेत उचलताना दिसत आहे. भरधाव वेगात असलेल्या बाईकचा तोल सुटला किंवा दुसऱ्या वाहनाला ती धडकली, तर त्याचे काय होईल, याची त्याला अजिबात भीती वाटत नसल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय हा तरुण त्याच्या जवळून जाणाऱ्या इतर वाहनांची पर्वा न करता बाईकवर स्टंट करत आहे.

दरम्यान, व्हिडीओमध्ये, बाईक चालवणारा एक व्यक्ती या तरुणाला स्टंट न करण्याचा सल्ला देत असल्याचं व्हिडीओमध्ये, दिसत आहे. मात्र, तरीही तो स्टंट करतो. इतकंन नव्हे तर त्याने पुढे जाणाऱ्यापोलिसांच्या गाडीकडीदेखील लक्ष न दिल्याचं पाहायला मिळत आहे. स्टंट करणारा तरुण पोलिसांच्या गाडीजवळून आरामात निघून जातो. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी या स्टंट करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

तर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ दिल्ली पोलिसांना टॅग केला आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रस्त्यावर स्टंटबाजीचा हा पहिलाच व्हिडिओ नाही, याआधीही असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. पोलिसांनी अनेकांवर कारवाईदेखील केली आहे. मात्र तरीही अशा घटना घडताना दिसत आहेत.

टीम झुंजार