निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा जि प कन्या शाळेत नुकतेच निधन झालेले मूळ रहीवाशी जळगाव व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेले पळासखेडा गावचे कवी लेखक गीतकार विधानपरिषद आमदार पदमश्री पुरस्काराने गौरव करण्यात आलेले कविवर्य ना धो महानोराना विद्यार्थीनी शिक्षकां च्या उपस्थितीत महानोरा वर प्रेम करणाऱ्या गावातील मान्यवरा नी मनोगत व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पित केली त्याच बरोबर शाळा समिती चे माजी अध्यक्ष ईश्वर ऊर्फ पिंटू मोरे यांना पण श्रद्धांजली वाहण्यात आली या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्तविक सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेलोडे यांनी केले.
सूत्रसंचालन मुख्याध्यापक हेमंत चौधरी यांनी केले प्रमुख मान्यवरानी महानोराबद्दल आपले मनोगत श्रद्धांजली पर भाषणात मांडले यावेळी योगायोग निंभोरा गावी आलेले पचायत समिती सदस्य दीपक पाटील यांनी पण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दिली तसेच गावातील मान्यवर प्रथम नागरिक सरपंच सचिन महाले ग्रा प सदस्य माजी जेष्ठ सरपंच डिगबर चौधरी पत्रकार राजु बोरसे ग्रामपंचायत सदस्य शेख दिलशाद सर सतीश नाना पाटील युनूस खा शफी खा युनूस खान अमान खान शकर ढाके भूषण भालेराव राहुल सोनार काशिनाथ शेलोडे शिक्षिका हेमलता पाटील पल्लवी राणे शा पो आ मदतनीस स्वयंपाकी रंजना चौधरी आशा पाटील व विद्यार्थी नी ची उपस्थिती होती.
हे वाचलंत का ?
- जळगावात एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारूभट्ट्या केल्या उध्वस्त; 7 लाखांचा मुद्देमालासह 27 जण ताब्यात.
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.