सावदा l प्रतिनिधी (प्रशांत सरवदे) – सावदा व परीसरात गेल्या आढवडाभरा पासून मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ आली असून यामुळे अनेक नागरिकांना याची लागण होत आहे सदर साथ ही एकमेकांना पासून दुसऱ्याकडे फैलावणारी असल्याने नागरिकांनी काळजी घ्यायची आवश्यकता आहे
या साथीत प्रथम डोळे चूळचुळतात डोळ्यातून पाणी येते व डोळे लाल होतात, डोळे आग जळलात अशी लक्षणे दिसून येत असून सदर साथ ही एकमेकांनकडे फैलावणारी असल्याने डोळे आलेल्या व्यक्ती पासून अंतर राखावे व लवकरात लवकर उपचार घेणे आवश्यक आहे
डॉ चेतन फेगडे :-
सदर साथ ही डोळे आलेल्या व्यक्ती कडे डोळ्यात बघितल्यास किंवा सानिध्यात आल्यास आपणास होऊ शकते, सद्य स्थितीत नागरिकांनी नेहमी हात स्वच्छ वारंवार धुवावे, आपले हात जास्त करून डोळ्या जवळ नेऊ नये हाताने डोळे चोळू नये, रुमालाने डोळे स्वच्छ करावे व रुमाल देखील स्वच्छ धुतलेला असावा, बाहेर जातांना डोळ्यास चष्मा अथवा गॉगल वापरावा, व डोळे आल्यास वा लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरानकडे जावे
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






