मिरज :- पोटच्या पोराची कुऱ्हाडीने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे कटरने तुकडे केल्याचा खळबळजनक प्रकार मिरजमध्ये घडला आहे. मुलाची हत्या केल्यानंतर बाप पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने खुनाची कबुली दिली.राजेंद्र यल्लाप्पा हंडिफोड या 50 वर्षांच्या व्यक्तीने त्याचच 30 वर्षांचा मुलगा रोहित राजेंद्र हंडिफोड याची हत्या केली.आपणच मुलाची हत्या केल्याचं सांगण्यासाठी आलेला बाप पाहून पोलिसांचीही पळापळ सुरू झाली.
हंडिफोड त्यांच्या मुलासह मिरजच्या गणेश तलाव लक्ष्मी मंदिर परिसरात राहत होते. राजेंद्र यांनी त्यांच्या मुलाची कुऱ्हाडीने हत्या केली, यानंतर त्यांनी मृतदेहाचे कटरने तुकडे केले.सुभाष नगर शिंदे हॉलजवळच्या एका प्लॉटवर राजेंद्र यांनी रोहितची हत्या केली. यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि पोत्यात भरले आणि काही तुकडे गणेश तलावात आणून टाकले.
मिरज पोलिस निरीक्षक यांच्यासह पोलीस फौज फाटा सुभाष नगर शिंदे हॉल आणि गणेश तलाव परिसरात लगेच दाखल झाला.रोहित दारू आणि जुगाराचा व्यसनाधीन होता. व्यसानासाठी रोहित कुटुंबाला त्रास देत असल्याने त्याचा बापाने कायमचा त्याचा काटा काढला. या घटनेनंतर बापाच्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा पश्चातापाचा लवलेश जाणवत नव्हता. मुलाची हत्या केल्याचं सांगण्यासाठी बापाने थेट पोलीस स्टेशनच गाठलं.

हे पण वाचा
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.