Viral Video:दोन महिलाचे न्यायाच्या मंदिरातच सुरू झाले भांडण,मग सुरू झाले चप्पल वॉर,दोघींनी एकमेकींना चपलेने चोपलं पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: तुम्ही सार्वजनिक नळ, मुंबईची लोकल, बस, मार्केट अशा ठिकाणी महिलांची भांडणं पाहिलीच असतील. पण आता तर कोर्टातही महिला एकमेकींवर तुटून पडल्या आहेत.कोर्टात महिलांनी एकमेकींना मारहाण केली आहे. न्यायाच्या मंदिरातच त्यांचा चप्पल वॉर सुरू झाला. दोघींनीही पायातील चपला काढून एकमेकींना चपलेने चोपलं आहे. कोर्टातील महिलांच्या फायटिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

बऱ्याचदा किरकोळ कारणावरून झालेल्या छोटाशा भांडणाचा मोठा वाद होता आणि हा वाद मग हाणामारीपर्यंत पोहोचतो. शेवटी हे प्रकरण पोलीस ठाणं आणि नंतर कोर्टापर्यंत जातं. पण आता याच कोर्टातही मारहाण पाहायला मिळाली. दोन महिला कोर्टाच भांडताना दिसल्या. फक्त भांडल्या नाही तर त्यांनी तुफान हाणामारीही केली.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन महिला न्यायायलात कशा एकमेकींवर तुटून पडल्या आहेत. त्यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी एका वकिलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या दोन्ही महिलांना समजवण्याचा प्रयत्न केला.पण तरी या महिला काही शांत होण्याचं नाव घेईनात. उलट त्यांचा वाद अधिकच वाढला. हातांनी मारामारीचं प्रकरण पायांच्या चपलेपर्यंत पोहोचलं.

पहा व्हिडिओ

व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
बहुतेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने यातील एक सासू आणि एक सून असावी असं म्हटलं आहे. तर एकाने ही फाइट पाहून मजा आली अशी प्रतिक्रिया दिली आहे.
तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

हे पण वाचा


टीम झुंजार