जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
वैचारिक गोंधळ राहील. त्यातून कोणतेही मत मांडायला जाऊ नका. खर्च वाढते राहतील. संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.
वृषभ :-
हातातील कामात यश येईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. वाचनात मन रमवावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. मन प्रसन्न राहील..
मिथुन :-
कामाचा आढावा लक्षात घ्यावा. मानसिक गोंधळ टाळावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराचा सल्ला घ्यावा.
कर्क :-
घरगुती कामे वाढीव राहतील. आळस टाळून कामे करावीत. नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावे. कामात यथायोग्य बदल संभवतात. कौटुंबिक खर्च वाढता राहील.
सिंह :-
स्वावलंबी बनावे लागेल. वास्तविकतेचे भान ठेवावे लागेल. पर्यटनाची योजना तूर्तास आखू नये. अति उत्साह दाखवू नका. निष्काळजीपणा दाखवू नका.
कन्या :-
मनाची ताकद ओळखा. नेमकी कृती यश देईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. खर्च आवाक्याबाहेर जाऊ देऊ नका. तुमचा हेतु साध्य होईल.
तूळ :-
मनातील शंका काढून टाकावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. विनाकारण शत्रुत्व पत्करू नका. परोपकाराचे महत्त्व लक्षात येईल. नवीन विचारातून शिकायला मिळेल.
वृश्चिक :-
बोलण्यात तिरकसपणा आणू नका. उगाच विरोधाला विरोध करू नका. मत सौम्यपणे मांडावे. औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
धनू :-
मनातील भावना व्यक्त कराव्यात. स्वयं निर्णयावर भर द्यावा. मनोरंजनात मन रमवावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्यात भर पडेल.
मकर :-
,इतरांवर अवलंबून राहू नका. घरातील वातावरण तप्त राहील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. आपल्या उपायांचा चांगला परिमाण जाणवेल. उत्तराला प्रत्युत्तर करू नका.
कुंभ :-
भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. वाढीव मेहनत करावी लागू शकते. आपल्या कामावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
मीन :-
परस्पर संवादाने कामे होतील. इतरांचे मत जाणून घ्यावे. स्पर्धा जिंकता येईल. करमणुकीत दिवस घालवाल. जोडीदाराचा विश्वास संपादन कराल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






