अश्लिल फोटो,व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकरास घरी बोलावून प्रेयसीने कोल्डड्रिंक मध्ये गुंगीचे औषध देऊन केली हत्या.

Spread the love

प्रियकराच्या मृतदेह फेकला नदीत, प्रेयसीसह तिच्या साथीदार दोघांना अटक
बागपत :
कायद्यानुसार, कोणीच कोणाला ब्लॅकमेल करू शकत नाही. आपल्यासोबत असं घडल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, असं पोलीस वारंवार सांगत असतात. मात्र तरीही अनेकजणांना हा दबाव सहन झाला नाही की ते टोकाचं पाऊल उचलतात.उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे.

अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने साथीदारासह मिळून ठार मारलं आणि त्याचा मृतदेह नदीत फेकला. पोलिसांनी याप्रकरणी प्रेयसीला ताब्यात घेतलं असून हत्येत वापरलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्यात एका बाईकचादेखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बामनोली गावात 31 जुलै रोजी ही घटना घडली. विद्युत कर्मचारी असलेल्या राजीवला त्याच्या ओळखीतल्या एका महिलेनं घरी बोलवलं होतं. कामानिमित्त ती त्याला घेऊन गेली, मात्र त्यानंतर तो त्याच्या घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर घडलेला सर्व प्रकार समोर आला. प्रेयसीनेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं.

आरोपी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचे राजीवसोबत प्रेमसंबंध होते. त्यादरम्यान त्याने तिचे अश्लिल फोटो, व्हिडिओ काढले. ते दाखवून तो तिला ब्लॅकमेल करायचा. त्याने तिच्याकडून हजारो रुपये वसूल केल्याचंही ती म्हणाली.याच ब्लॅकमेलिंगपासून सुटका मिळवण्यासाठी तिने त्याच्या हत्येचा कट रचला. तिने राजीवला घरी बोलवलं आणि नशेचं औषध घातलेलं कोल्डड्रिंक त्याला प्यायला दिलं. त्यानंतर तिने आणि तिच्या साथीदाराने त्याचा गळा आवळला, त्याचा श्वास थांबताच मृतदेह बाईकवरून नेला आणि काळ्या नदीत फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी राजीवचा मृतदेह बाहेर काढला असून दोन्ही आरोपींना तुरुंगात टाकलं आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार