संतापजनक! कामावरून घरी जात असलेल्या तरुणीचे भररस्त्यावर कपडे फाडून केलं नग्न, एका महिलेने पीडिचे प्लास्टिकच्या कागदाने झाकले तिचे अंग.

Spread the love

तरुणीला चुकीच्या पद्धतीने केला होता स्पर्श तिने घेतला आक्षेप म्हणून विकृताने केले हे कृत्य.हे कृत्य करतांना त्याची आई सुद्धा होती सोबत .
हैदराबाद :- जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना घडली आहे. येथील एका विकृताने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या तरुणीचे कपडे फाडून तिला भररस्त्यावर नग्न केलं आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना आरोपीची आईही त्याच्याबरोबर होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी तरुणासह त्याच्या आईला अटक केली आहे.

ही विकृत घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणी एका कपड्याच्या दुकानात काम करते. रविवारी रात्री आठच्या सुमारास दुकानातील काम संपवून ती रस्त्याने चालत आपल्या घरी चालली होती.
यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपीनं पीडित तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यावर पीडितेनं आक्षेप घेतल्यानंतर विकृत आरोपी आक्रमक झाला आणि त्याने तिचे भररस्त्यावर कपडे फाडून तिला नग्न केलं. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य एका महिलेनं पीडितेची मदत करत आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी तिच्यावरही धावून गेला.

विशेष म्हणजे ही घटना घडत असताना आरोपीच्या दुचाकीवर त्याची आईही होती. तरीही तिने पीडित तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीसह त्याच्या आईला ताब्यात घेतलं. पीडित युवतीला मदत मिळेपर्यंत ती रस्त्यावर नग्न अवस्थेत स्वत:चं अंग झाकण्याचा प्रयत्न करत होती. यानंतर काही महिलांनी पीडित तरुणीला निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या शीटने झाकलं. या घटनेचा पुढील तपास जवाहर नगर पोलीस करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. घटनेच्या वेळी काही महिलांनी पीडितेला निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकशीटने झाकले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आरोपीच्या आईने त्याला रोखण्याची किंवा महिलेचा बचाव करण्याचा एकही प्रयत्न केला नाही. या प्रकरणी कलम 354 (ब), 323, 506 आर/डब्ल्यू 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार