जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मन:स्वास्थ्य बिघडू देऊ नका. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. क्षुल्लक गोष्टींचा फार विचार करू नका. मुलांची काळजी लागून राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
वृषभ :-
ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. आवडीची कामे करायला वेळ मिळेल. जुगाराची आवड पूर्ण करता येईल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. आपला मूड बिघडणार नाही याची काळजी घ्या.
मिथुन :-
अवास्तव चर्चा करू नका. सत्याची कास सोडू नका. मित्रांशी सुसंवाद साधावा. घरातील वातावरण हसते-खेळते ठेवाल. आपली हौस पूर्ण करून घ्याल.
कर्क :-
जोडीदाराच्या वर्तनाने ताण वाढू शकतो. सरसकट एकच विचार करू नका. हातातील कामात यश येईल. बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. भावंडांची उत्तम साथ मिळेल.
सिंह :-
बोलताना शब्दांचे वजन लक्षात घेऊन बोला. आपलेच मत खरे करायला जाऊ नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खायला मिळतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील.
कन्या :-
अनावश्यक खर्चाला आवर घालावा लागेल. कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल.
तूळ :-
मानसिक तोल ढळू देऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कलेच्या क्षेत्रात काहीतरी नवीन शिकायला मिळेल. जोडीदाराच्या मताला पुष्टी द्याल. काही तडजोडी कराव्या लागतील.
वृश्चिक :-
मनातील इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. कामात पळवाट शोधून चालणार नाही. दिवस संमिश्र राहील. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
धनू :-
अनावश्यक सल्ले देऊ नका. मुलांच्या तक्रारी वाढू शकतात. त्यांची बाजू समजून घ्यावी लागेल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. जोडीदाराविषयी संभ्रम दूर होईल.
मकर :-
संपूर्ण माहितीशिवाय वक्तव्य करू नका. उगाच जुन्या गोष्टी उकरून काढत बसू नका. योग्य आहार घ्यावा. घरातील गोष्टी संयमाने हाताळाव्यात. शक्यतो वादविवादात पडू नका.
कुंभ :-
नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. उष्णतेचे त्रास संभवतात. कामात किरकोळ समस्या जाणवू शकतात. मनाची द्विधावस्था होऊ शकते. अति विचार करू नका.
मीन :-
चेष्टा जपून करावी. वेळ पाळणे खूप गरजेचे आहे. कौटुंबिक घडी सांभाळावी. आर्थिक बाबीत आततायीपणे वागू नका. बोलताना भडक शब्दांचा वापर करू नका.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






