एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- बँकेच्या समोर लावलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीतून दोन लाख पन्नास हजार रुपये अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास एच.डी.एफ.सी.बँकेसमोर घडली.बँकेच्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला असून त्यास पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.दरम्यान भर दुपारी बँकेसमोरून अडीच काहा रुपयांची चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी,की येथील सम्यक इंग्लिश मेडियम स्कूलचे बांधकाम सुरु असल्यामुळे ठेकेदारास पैसे द्यावयाचे असल्यामुळे शाळेच्या प्राचार्या नितां पाटील यांनी शाळेतील शिक्षक उज्वलसिंग विजयसिंग पाटील यांना धनादेश दिलेत.उज्वलसिंग पाटील यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्टेट बँकेतून तीन लाख रुपये काढले आणि दुचाकीच्या डिक्कीत ठेवले.त्यांनंतर उज्वलसिंग पाटील हे दुचाकी क्रमांक एम.एच.१९ बी.व्ही.५२८८ ने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दत्त कॉलनीत असलेल्या एच.डी.एफ.सी.बँकेत पैसे काढण्यासाठी गेले.
बँकेच्या समोर दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकी उभी करून ते बँकेत गेले असता अज्ञात चोरट्याने गाडीच्या डिक्कीतून सुमारे अडीच लाख रुपये रोख काढून पसार झाला. उज्वलसिंग पाटील हे बँकेतून बाहेर आले असता त्यांना गाडीची डिक्की उघडी दिसली.त्यांनी डिक्की उघडून पाहिली असता अज्ञात चोरट्याने डिक्कीतील तीन लाख रुपयांपैकी अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले आणि पन्नास हजार रुपये डिक्कीतच आढळून आल्याने ते त्वरित बँकेत गेले आणि बँकेतील सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज पाहिले असता एक संशयित त्याठिकाणी फिरत असल्याचे दिसून आले.
अज्ञात चोरटा स्टेट बँकेपासूनच उज्वलसिंग पाटील यांचा पाठलाग करीत असण्याची शक्यता आहे.स्टेट बँकेतील सीसीटीव्हीत एक अज्ञात व्यक्ती दिसत असून तीच अज्ञात व्यक्ती एच.डी.एफ.सी.बँकेच्या सीसीटीव्हीत दिसत आहे.अडीच लाख रुपयांची चोरी झाली असल्याची माहिती उज्वलसिंग पाटील यांनी प्राचार्या नितां पाटील, डॉ.राहुल पाटील,शैला पाटील,विलास पाटील यांना दिली.याबाबत उज्वलसिंग पाटील यांनी
दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाअसून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील
लोहार तपास करीत आहे.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.