संतापजनक! पतिच्या डोक्यावर काठीने वार करून केला खून, मृतदेहाच्या शेजारीच नरधमाने केला पत्नीवर बलात्कार.

Spread the love

बलात्कार आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक.
छत्तीसगड : छत्तीसगडमधील अंबिकापूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.जिथे एका नराधमाने आधी एका तरुणाची हत्या केली आणि नंतर त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. आरोपीने महिलेच्या पतिच्या डोक्यावर काठीने वार केले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने पत्नीला धमकावून पतीच्या मृतदेहाशेजारी अत्याचार केला.

नेमका काय प्रकार…..
मिळालेल्या माहितीनुसार, अंबिकापूर येथील ही घटना आहे. शहरातील मणिपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जशपूरचे रहिवासी असलेले ४२ वर्षीय सुखलाल दर्रीपारा येथे बांधकाम सुरू असलेल्या झोपडीत पत्नीसह राहत होते. सोमवारी रात्री सुखलाल आणि त्यांची पत्नी जेवण करून झोपले होते. दरम्यान, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांचाच ओळखीचा व्यत्ति कार्तिक कोरवा (21) हा सुखलाल यांच्या झोपडीत आला आणि त्यांनी दाम्पत्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्याने सुखलाला त्याचे पत्नीसोबत अवैध संबंध असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. प्रकरण इतके वाढले की त्याने सुखलालला मारहाण करण्यास सुरुवात केली.

पतीने विरोध करताच नराधमाने त्याची हत्या करून त्याच्या पत्नीवर अत्याचार केला. एका बाजूला पतीचा मृतदेह पडून होता त्याच्या शेजारीच आरोपी तिला धमकावत अत्याचार करत होता. असं पिडितेनंं सांगितलं, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पतीने विरोध करताच नराधमाने त्याची हत्या करून त्याच्या पत्नीवर अत्याचार केला. एका बाजूला पतीचा मृतदेह पडून होता त्याच्या शेजारीच आरोपी तिला धमकावत अत्याचार करत होता. असं पिडितेनंं सांगितलं, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२, ३७६ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीने आपला गुन्हाही मान्य केला.

काठीने वार करून हत्या…..
आरोपी कार्तिकने सुखलालला सांगितले की, त्याचे पत्नीसोबत अवैध संबंध आहेत. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर कार्तिकने सुखलालवर काठीने वार करून त्याचा खून केला. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टीम झुंजार