CCTV VIDEO: एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगितलं की लहान मुलं ती करतातच. खरंतर हे लहान मुलंच नव्हे तर प्रौढांच्या बाबतीही सारखंच आहे. जिथं धोका आहे, असं सांगितलं जातं तिथंच काही लोक मुद्दामहून जातात आणि आपला वारंवार आपला जीव धोक्यात घालतात.असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच धडकी भरेल.रेल्वे रूळ ओलांडू नये, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. पण तरी काही लोक जिने, ब्रीज चढण्याचा त्रास नको म्हणून हाच शॉर्टकट निवडतात.
सध्या असाच एक रेल्वे अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालताना दिसत आहेत, जशी वरदळ आपल्याकडे रेल्वे स्टेशवर असते तशीच गर्दी लोकांची वरदळ या स्टेशनवर दितस आहे. तुम्ही पाहू शकता रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती उभा आहे आणि त्याच्या हातात लहान बाळ आहे. दरम्यान बाजुच्या रेल्वे ट्रॅकवरुन एक ट्रेन येत आहे, मात्र याचा त्याला काहीही अंदाज नसतो.
आणि याचवेळी तो व्यक्ती लहान मुलासोबत रेल्वे रुळ ओलांडायला जातो आणि नको ते धक्कादायक घडतं. याची जराही कल्पना नसताना मागून येणारी ट्रेन बाप-लेकाला धडक देते आणि ते दोघेही प्लॅटफॉर्मवर पडतात. या धडकेत तो व्यक्ती आणि चिमुकल्या दोघेही प्लॅटफॉर्मवर फेकले जातात.त्यानंतर या दोघांचं काय झालं हे पुढे दाखविण्यात आलेलं नाही. मात्र, व्हिडीओवरुन तुम्ही अंदाज बांधू शकता की, दोघेही गंभीर जखमी झाले असणार.
पाहा व्हिडीओ…
आपण दररोज कुठे ना कुठे रेल्वे अपघात झाल्याच्या बातम्या ऐकतो. यापैकी बहुतांश अपघात हे रुळ ओलांडतानाच झालेले असतात. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. अन् आता हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक भडकले आहेत. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या अशा लोकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.
हे पण वाचा
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.