गोंडगाव घटनेच्या निषेधार्थ एरंडोल बंदला शंभर टक्के प्रतिसाद.

Spread the love

एरंडोल l प्रतिनिधी :- गोंडगाव (ता.भडगाव) येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा निषेधार्थ पुकारलेल्या बंदला शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवल्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यावर आणि बाजारपेठेत सर्वत्र शांतता निर्माण होऊन रस्ते निर्मनुष्य दिसत होते.गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील विविध सामाजिक संघटना आणि महिला संघटनांच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून आरोपीविरोधात कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

मोर्चेक-यांसमोर मनोगत व्यक्त करतांना घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.सोशल मिडीयाच्या माध्यमातून बंडाचे आवाहन करण्यात आले होते.सोशल मिदियावरील आवाहनाला प्रतिसाद देवून शहरातील सर्व व्यापा-यांनी, लहान दुकानदारांनी व व्यावसायिकांनी प्रतिसाद देवून
स्वयंस्फुर्तीने बंदला पाठींबा दर्शवून घटनेचा निषेध केला.विशेष म्हणजे बंदचे आवाहन कोणत्याही संघटनेने केले नव्हते तरीही बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात औषध विक्रीचे व अत्यावश्यक सेवेचे दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद होते.

बंदमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेत शुकशुकाट निर्माण झाला होता.बंदमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.आजच्या बंदमुळे शहरातील नागरिकांना कोरोना काळातील लॉकडाऊनची आठवण झाली.सोशल मिडीयाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनास प्रतिसाद देवून शहरातील व्यावसायिकांनी शहर बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी नागरिकांचे आभार मानले.

हे पण वाचा

टीम झुंजार