म्हसावद l प्रतिनिधी :- भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे घडलेली घटनेच्या निषेधार्थ म्हसावद गावात मुक मोर्चा काढण्यात आला अल्पवयीन बालिका कू. कल्याणीवर अत्याचार करून तिची हत्या कलेच्या निषेर्धात शुक्रवारी म्हसावद गावात हिंदू मुस्लिम बांधव एकजुटीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पासून जमा झाले व तेथून एक जुटीने महिला व शाळेतल्या बालिका मुली पोलिस स्टेशन पर्यंत काढण्यात आला.
गावातले हिंदू मुस्लिम पोलिस अधिकारी,पोलिस कॉन्स्टेबल इत्यादी मोठ्या प्रमाणात हजार होते. आणि आरोपी विरोधात कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिला व हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली.सोशल मीडियाचा माध्यमातून बंदचे अहवान करण्यात आले होते,सोशल मीडियावरील अहवणाला प्रतिसाद देऊन म्हसावद
गावातील सर्व व्यापारी दुकानदार गावकरी यांनी प्रतिसाद देऊन स्वयं सफुर्तीने मुक मोर्चाला पाठिंबा दर्शवून निषेध केला.मुक मोर्चाच्या या निषर्धात गावातील प्रमुख रस्ते बाजार पेठ मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले होते. महिला,बालिका, विद्यालय तील मुली सुद्धा एकजुटीने जमा होऊन कु. कल्यानीच्या हत्याऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी या हेतूने पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






