नासिक येथील दोन जणांविरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल.
एरंडोल l प्रतिनिधी :- इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकचे शोरूम व डीलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने येथील एका वकिलाची सुमारे १० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी नासिक येथील दोन जणांविरुद्ध कासोदा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत कसोदा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील वकील वासुदेव धोंडू वारे (४६) यांची निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील
संजय दिनकर जिवरक व त्यांचा मुलगा महेश संजय जिवरक यांनी ६ नोव्हेंबर २०१८ पासून इलेक्ट्रीक चार्जिंग बाईक GIVS एक्स्पोर्ट ॲण्ड इम्पोर्ट प्रा.लि. ओझर सैय्यद पिंप्री नाशिक येथील कंपनीतून फिर्यादी वासुदेव वारे यांना कासोदा येथे शोरूम टाकण्याकरिता २० गाड्या व डीलरशिप मिळवण्यासाठी फिर्यादी वासुदेव वारे यांच्याकडून १० लाख ८० हजार ऐवढी रक्कम घेऊन आजपर्यंत ना २० गाड्या दिल्यात ना डीलरशिप देखील दिली नाही.
त्यामुळे संजय दिनकर जिवरक व त्यांचा मुलगा महेश संजय जिवरक यांनी वासुदेव वारे यांची संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी कासोदा पोलीसांत वासुदेव धोंडू वारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय दिनकर जिवरक व त्यांचा मुलगा महेश संजय जिवरक यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
हे पण वाचा
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.