गुडांचा रूद्रावतार पाहून मध्यस्थी करण्याचे धाडस कोणीच केले नाही, पहा धक्कादायक व्हिडीओ
CCTV Video: हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. चिमुकल्याच्या डोळ्यादेखत त्याच्या वडिलांना काही गुंड मारहाण करत असल्याचा हा थरार अंगावर काटा आणणारा आहे.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, वडील नेहमीप्रमाणे बाईकवरून मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होते. शाळेजवळ आले असता त्यांनी बाईक थांबवली अन् गुडांनी चिमुकल्यासमोर त्याच्या वडिलांवर हल्ला चढवला. ही घटना पंजाबमधील मानसा येथील असल्याचे कळते.
दरम्यान, शाळेजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा थरार कैद झाला आहे. आपल्या वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून मुलगा जोरजोरात रडू लागला. गुडांनी बाईक थांबताच मुलाला बाजूला नेले अन् त्याच्या वडिलांना लाठ्यांनी मारहाण केली. बघ्यांची संख्या देखील लक्षणीय होती पण गुडांचा रूद्रावतार पाहून मध्यस्थी करण्याचे कोणाचेच धाडस झाले नाही. बाईक शाळेजवळ येताच वडिलांनी बाईक थांबवली तेव्हा लगेच ४-५ गुंडांनी हल्ला केला आणि लाठ्या-रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वडिलांना मारहाण होत असताना एका गुंडाने मुलाला सुरक्षितपणे दुचाकीवरून खाली उतरवले आणि नंतर त्याच्या वडिलांना काठीने मारहाण केली.
आरोपींवर गुन्हा दाखल……..
शाळेसमोर घडलेली ही हृदयद्रावक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेले अनेक पालक उपस्थित होते. गुंड आणि त्या व्यक्तीमध्ये काही कारणावरून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी ३०७ अर्थात हत्येचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






