किडनी ठणठणीत ठेवणारे ५ उपाय, शरीर होईल डिटॉक्स- किडनी स्टोनचा धोका कमी

Spread the love

किडनी शरीरातील एक महत्वपूर्ण अवयवांपैकी एक आहे. किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते. अतिरिक्त द्रवपदार्थ साफ करून मूत्र उत्पादन करते. हे पदार्थ बाहेर काढण्याचे काम किडनी करते. नायट्रोजन, पोटॅशियम, सोडीयम, फॉस्फेट हे पदार्थ बाहेर काढले जातात.

किडनी लघवीद्वारे मुत्रमार्ग साफ करते ज्यामुळे संसर्ग होत नाही आणि इतर समस्या टाळता येतात. यामुले किडनी इन्फेक्शन, क्रोनिक किडनी डिसीज, यांसह किडनीचे गंभीर आजारही होऊ शकतात. आयुर्वेद तज्ज्ञ कपिल त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

Pic for Google

कोथिंबीर मुत्रमार्ग निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. यात विषाणूनाशक गुण असतात जे किडनी साफ करून निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासाठी कोथिंबीरीची पानं धुवून लहान लहान तुकड्यांमध्ये कापा. एक कप पाण्यात उकळवून घ्या.. हे पाणी थंड झाल्यावर गाळून याचे सेवन करा.

pic for Google

तुळशीच्या पानांमध्ये विषाणूनाशक गुण असतात. जे किडनी निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. हे पाणी प्यायल्यानं किडनीला बरेच फायदे मिळतात. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. एक कप पाणी उकळण्यासाठी ठेवा त्यात तुळशीची पानं घाला. मध्यम आचेवर शिजवल्यानंतर जवळपास ५ ते ७ मिनिटापर्यंत थंड होऊ द्या. गाळून या पाण्याचे सेवन करा

pic for Google

पारीजातची पानं किडनीसाठी उपयोग ठरतात. कारण यात विषाणूनाशक असते. जे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

pic for Google

पुनर्नवाच्या पानांमध्ये मूत्र आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्याची क्षमता असते. हे मूत्रपिंड साफ करण्यास देखील मदत करू शकते आणि मूत्रमार्गाचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Pic for Google

गोक्षुराचे पान मूत्रमार्गाचे आरोग्य सुधारण्यास आणि किडनीतून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करू शकते. यासाठी काही गोखरूची पाने स्वच्छ करून त्याचे छोटे तुकडे करावेत. एक कप पाणी उकळण्यासाठी ठेवा आणि त्यात चिरलेली पाने घाला. साधारण ५-७ मिनिटे मध्यम आचेवर हळूहळू शिजू द्या. कोमट झाल्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन प्या. यामुळे किडनीच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. याशिवाय खाण्यापिण्याची काळजी घ्या, सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा आणि पुरेसे पाणी पिणे इ.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार