खिर्डी येथील जि.प.ऊर्दू शाळेत गणवेश वाटप..

Spread the love

विद्यार्थ्यांनो शिक्षणावर भर द्या- सादिक पिंजारी.

निंभोरा प्रतिनिधी- परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील खिर्डी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना शुक्रवारी गणवेश वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष रफिक खान रशीद खान होते. तसेच व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक शेख निसार शेख रऊफ तसेच समितीचे शिक्षणतज्ञ सादिक पिंजारी(मंत्री) समिती सदस्य शेख फरीद शेख कमर, मोहसीन बेग याकुब बेग, शेख अजगर शेख ईमाम, शेख असलम आदी उपस्थित होते.


याप्रसंगी सादिक पिंजारी(मंत्री) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणावर भर द्यावे असे आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजिद खान बाबू खान तर आभार माजीद खान यासीन खान यांनी मानले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शेख निसार शेख रऊफ व शाळेतील शिक्षक यांच्यासह शालेय समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी मोठया संख्येने विद्यार्थी,विद्यार्थिंनी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार