जामनेर मराठी पत्रकार संघ, जामनेर तालुका पत्रकार मंच,अखिल भारतीय पत्रकार संघ यांच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले मागणीचे निवेदन जामनेर (प्रतिनिधी):- पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर करण्यात आलेला भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका मराठी पत्रकार संघ ,जामनेर तालुका पत्रकार मंच, अखिल भारतीय पत्रकार संघ या संघटनेच्या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आले
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोरा आमदार किशोर पाटील यांनी अश्लील भाषेचा वापर करीत शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना घडल्यानंतर संदीप महाजन यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे यामुळे अशा प्रकारे पत्रकार यांच्यावर हल्ले करणाऱ्या आरोपीची चौकशी करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
निवेदन देताना पत्रकार भानुदास चव्हाण,प्रल्हाद सोनवणे,प्रदीप गायके, सुहास चौधरी,राहुल इंगळे,लियाकत अली सय्यद,सुरेश महाजन,किरण सोनवणे,प्रकाश सैतवाल,रवींद्र झाल्टे, अमोल महाजन,संजय सूर्यवंशी,सागर लव्हाळे, पंढरी पाटील,विलास ठाकरे,मीनल चौधरी,मीना शिंदे,प्रीती कुमावत गजानन तायडे,शांताराम झाल्टे,नितीन इंगळे,मच्छिंद्र इंगळे यांच्यासह जामनेर तालुका शहर व तालुक्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






