महिलेवर बलात्कार केल्याच्या व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर केला व्हायरल, पीडितेने तलावात उडी मारुन केला आत्महत्येचा प्रयत्न.
नागौर :- (राजस्थान) येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीवरील उपचारासाठी पैसे घेतल्यानंतर त्यावरील व्याज वसूल करण्यासाठी महिलेवर बलात्कार करण्यात आला.
महिलेच्या पतीला अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे तिने उपचारासाठी 10 हजार रुपये घेतले होते. महिलेने काही पैसे परत केले होते पण आरोपी व्याज मिळावं यासाठी महिलेवर दबाव टाकत होता, यानंतर एके दिवशी त्याने महिलेवर बलात्कार केला आणि व्हिडीओ शूट करत व्हायरल केला. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
पतीवरील उपचारासाठी पैसे नसल्याने महिला प्रयत्न करत होती. पण काही केल्या पैशांची व्यवस्था होत नव्हती. अखेर तिने मेहरदीन याच्याशी संपर्क साधला. नागौरच्या दिल्ली दरवाजाजवळ राहणारा मेहरदीन व्याजावर पैसे देतो अशी माहिती पीडित महिलेने दिली आहे.
पीडितेने आरोपीकडून घेतले होते 10 हजार रुपये…….
महिलेने मेहदरीनकडून 10 हजार रुपये उधार घेतले होते. यानंतर महिलेने मेहदरीनला 5 हजार रुपये परत केले होते. यानंतर ती महिन्याला 500 रुपये देत होती. पण यादरम्यान आरोपी मेहदरीन वारंवार व्याजासाठी दबाव टाकत होता. यानंतर एक दिवस महिलेचा पती घरात नसताना, आरोपी घरात घुसला आणि तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने अश्लील व्हिडीओही शूट केले.
जोधपूरला नेऊन केला बलात्कार
आरोपी मेहदरीन पीडित महिलेला जोधपूरला घेऊन गेला आणि तिथेही बलात्कार केला. यानंतर त्याने व्हिडीओ शूट करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलेने तलावात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिकांनी पाहिलं असता महिलेला वाचवलं.
यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागौर कोतवालीचे सीआयए रमेंद्र सिंह हाडा यांनी सांगितलं आहे की, एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. तिने एका तरुणाकडून काही पैसे उधार घेतले होते. तिने पैसे परत केल्यानंतरही व्याजासाठी तो त्रास देत होता, त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने व्हिडीओ शूट करत व्हायरलही केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.