जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. आनंद वार्ता कानी पडतील. जोडीदाराचे सौख्य वाढेल. अति उत्साह दाखवू नका. जुन्या मित्रांची चांगली साथ लाभेल.
वृषभ :-
आर्थिक योजना गुप्ततेने कराव्यात. शहानिशा केल्याशिवाय गुंतवणूक करू नका. नातेवाईक नाराज होऊ शकतात. डोळ्यांची काळजी घ्यावी. बोलण्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.
मिथुन :-
योग्य शहानिशा केल्याशिवाय कामे करू नका. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. अनावश्यक खर्च टाळावेत. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.
कर्क :-
संधीचे सोने करायला शिका. गृहीणींवरील ताण वाढू शकतो. कठोर परिश्रमाचे चीज होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आवड पूर्ण करताना खर्चाकडे लक्ष ठेवा.
सिंह :-
स्वत:चेच मत खरे करायला जाऊ नका. खेळकरपणे कामे हाताळाल. बौद्धिक ताण जाणवेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. प्रलोभनापासून दूर राहावे.
कन्या :-
मानसिक ताण बाजूला सारा. सकारात्मक विचारसरणीचा मार्ग धरावा. जवळच्या मित्राकडून आधार मिळेल. पालकांचे सहकार्य घ्यावे. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.
तूळ :-
आवडी-निवडी वर अधिक खर्च कराल. आवडत्या छंदाला वेळ द्यावा. आजचा दिवस शुभ कारक. इतरांच्या चांगल्याचा विचार करावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
वृश्चिक :-
मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मित्राला मदत कराल. प्रिय व्यक्तीला भेटण्याची ओढ वाटेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी घटना मन खिन्न करू शकते.
धनू :-
रागावर नियंत्रण ठेवावे. नातेवाईकांची नाराजी सहन करावी लागेल. मुलांविषयी मनात नाराजी उत्पन्न होईल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे.
मकर :-
स्वत:च स्वत:ची अवहेलना करू नका. जुनी कामे निघतील. कौटुंबिक शांतता जपावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे. आवडत्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा माराल.
कुंभ :-
नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. बुद्धी आणि विवेक कमी लावावेत. जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल. भागीदारीत वर्चस्व दाखवाल.
मीन :-
कुटुंबातील लोकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. जनसंपर्कात भर पडेल. मनोबल वृद्धिंगत होईल. स्वभावातील उधळेपणा ओळखावा. चटकन नाराजी दर्शवू नका.
हेही वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.