पुणे :- एका वस्तीतल्या शाळेतला धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आहे. १० विद्यार्थी असलेल्या या शाळेत फक्त १ विद्यार्थी येत असल्याने त्या शाळेच्या शिक्षकाने विष पिऊन आत्महत्या केली.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.यामुळे त्या शिक्षकाच्या आत्महत्येला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात जावजीबूवा नावाचे गाव आहे. येथील होलेवस्ती इथे एक प्राथमिक शाळा आहे. या प्राथमिक शाळेत १० विद्यार्थी शिकत होते. या विद्यार्थांना शिकवण्यासाठी अरविंद देवकर नावाचे शिक्षक होते.
या शाळेत दहा विद्यार्थांपैकी फक्त एकच विद्यार्थी शाळेत हजर राहायचा. येथील शिक्षक असणाऱ्या अरविंद देवकर यांना आपल्या शाळेतील ९ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला असे समजले. आपल्या काही चुकीच्या धोरणांमुळे विद्यार्थी आपली शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जात आहेत, असे त्यांना वाटले. यामुळे त्यांनी फवारणीसाठी वापरल जाणार तणनाशक औषध पिऊन शाळेतच आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक धक्कादायक सुसाईड नोट लिहली होती. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आणि आत्महत्या करण्याचे कारण समजले. शाळेची दुरवस्था पाहून अरविंद यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेतल. त्यानंतर त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदानाचे महत्त्व या माध्यमातून मुलांना पटवून देण्याचा अरविंद यांचा हेतू होता.
असे असताना मात्र अरविंद देवकर यांचा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना पटला नाही. त्यांनी शाळेत येऊन गोंधळ घातला आणि मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवले. शाळेतील विद्यार्थी ही शाळा सोडून गेल्याने अरविंद देवकर यांचे मानसिक खच्चिकरण झाले.
चांगलं काहीतरी करण्याच्या हेतूने केलेल्या कृतीमुळे सर्वच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने त्यांनी औषधाचे सेवन करुन आत्महत्या केली. चिठ्ठीत हा सगळा घटनाक्रम अरविंद देवकर यांनी लिहून ठेवला आहे.
हे पण वाचा
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले