धक्कादायक घटना! दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करून 5 जणांनी आळी-पाळीने केला अनेक महिन्यांपर्यंत बलात्कार.

Spread the love

मोठी मुलगी गर्भवती झाल्याचं समजताच कुटुंबीयांना बसला धक्का
बांदा (उत्तर प्रदेश):-
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील तरुणांनी दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करून त्यांना जंगलात नेले आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला, असा आरोप आहे.
या घटनेनंतर, जेव्हा मोठी मुलगी गरोदर असल्याचे घरच्यांना समजले तेव्हा त्यांना धक्का बसला. संबंधित पीडित कुटुंबाने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे. यावर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

हे प्रकरण बदौसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणार्या पीडितेच्या आईने दिलेल्या महितीनुसार, “गेल्या 20 जुलैला माझ्या दोन्ही अल्पवयीन मुली घरात झोपल्या होत्या. मी आणि माझा पती सकाळी उठलो, तर दोन्ही मुली घरात नव्हत्या. घरात बघितले असता रूमचे छत तुटलेले होते. यानंतर आम्ही मुलींचा शोध घेतला होता, पण त्या सापडल्या नव्हत्या.”

धमकावत आळी-पाळीने केला बलात्कार’ –
पीडित मुलींच्या आईने सांगितले, ’21 जुलैच्या सायंकाळी दोन्ही मुली घरी परतल्या आणि सांगितले की, गावातील काही लोक घराचे छप्पर तोडून आम्हाला जबरदस्तीने घेऊन गेले. यानंतर त्यांनी धमकावत आळी-पाळीने बलात्कार केला”. एढेच नाही, तर हे लोक जीवे मारण्याची धमकी देत मुलींवर गेल्या अनेक महिन्यांपासून बलात्कार करत होते, असा आरोपही संबंधित कुटुंबीयांनी केला आहे.

5 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल –
कुटुंबीयांनी म्हटल्यानुसार, सामूहिक बलात्कारानंतर, त्यांची मोठी मुलगी गर्भवती झाली आहे. महिलेने पोलिसत तक्रार करत आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर पोलिसांनी 5 जनांविरोधात सामूहिक बलात्कार, पॉक्सो अॅक्ट सह इतरही काही कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात माहिती देताना एसएचओ विजय कुमार म्हणाले, संबंधित तक्रारीनंतर, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच बरोबर, पीडित मुलींचे मेडिकलही करण्यात आले आहे. पीडित मुलींनी न्यायालयात जबाब दिल्यानंतर पुढील कारवाई केली जात आहे. याशिवाय आरोपींचा शोधही घेतला जात आहे.

टीम झुंजार