कशाला हवा टूथब्रश? बोटाने दात घासले तर काय बिघडतं? डेंटिस्ट सांगतात..

Spread the love

Can you use your finger as a toothbrush? दातांचे आरोग्य हा गंभीर विषय आहे, सर्वाधिक दुर्लक्ष दातांकडेच होतं.

दात स्वच्छ ठेवण्यासाठी तज्ज्ञ दिवसातून दोन वेळा दात घासण्याचा सल्ला देतात. रोज ब्रश केल्याने दातांवर साचलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होते. बाजारात अनेक प्रकारचे ब्रश उपलब्ध आहेत. पण काही लोकं तरीही बोटांनी दात स्वच्छ करतात. अनेकवेळा लोकांकडे ब्रश उपलब्ध नसतो, तेव्हा ते बोटांनी दात स्वच्छ करतात. परंतु, बोटांनी घासलेले दात स्वच्छ होतात का?

यासंदर्भात, दिल्लीस्थित गुलाटी डेंटल क्लिनिकचे दंतचिकित्सक डॉ. वैभव गुलाटी सांगतात, ”बोटाने दात स्वच्छ करणे हानिकारक नाही. बोटांनी दात घासल्याने, दातांवर जमा झालेली पिवळी प्लेक आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. यासह तोंडातील दुर्गंधही कमी होते. मात्र बोटाने दात स्वच्छ केल्याने गम लाइन आणि दातांमध्ये साचलेली घाण व्यवस्थित साफ होत नाही. जर आपल्याकडे टूथब्रश असेल तर, बोटांनी दात घासणे टाळा. इमर्जन्सीमध्ये आपण फिंगर ब्रशिंग करू शकता”(

टूथब्रश नसेल तर, दात कसे स्वच्छ करायचे?

pic for Google

डॉक्टर वैभव गुलाटी सांगतात, ”जर आपल्याकडे ब्रश नसेल तर, आपण बोटांनी दात घासू शकता. यासाठी आधी हात साबणाने स्वच्छ धुवा, त्यानंतर डाव्या तळहातावर टूथपेस्ट घ्या, व उजव्या हाताच्या बोटावर पेस्ट घेऊन हळुवारपणे दात घासा. बोट दातांच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचेल असा प्रयत्न करा.

जर आपल्याकडे ब्रश आणि टूथपेस्ट दोन्ही नसेल तर, कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून, गुळण्या करून दात स्वच्छ करा. मीठ हे अँटी-बॅक्टेरियल आहे, यामुळे दात स्वच्छ होतात. याशिवाय आपण तुरटीचा देखील वापर करू शकता. मीठ आणि मोहरीचे तेल मिसळून आपण हिरड्यांचा मसाज करू शकता. यामुळे हिरड्या मजबूत होतील.

दात स्वच्छ करण्यासाठी माऊथवॉश प्रभावी.

Pic for Google

डेंटिस्टच्या म्हणण्यानुसार, टूथपेस्ट आणि टूथब्रश नसेल तर, आपण माउथवॉशचा वापर करू शकता. यामुळे दातांमधील बॅक्टेरिया कमी होतात, यासह दुर्गंधी दूर होते. दिवसातून २ वेळा ब्रश करणं आवश्यक आहे. असे केल्याने दातांमध्ये टार्टर आणि प्लेक जमा होणार नाहीत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार