Viral Video : रेल्वे आणि मेट्रोमधील गर्दीमुळे अनेकदा स्टेशन येईपर्यंत बसण्यासाठी सीट मिळत नाही. यामुळे प्रवाशांना उभे राहूनचं प्रवास करावा लागतो. पण रोज उभं राहून प्रवास करण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी एका तरुणाने नामी शक्कल लढवली आहे.
तरुणाची ही युक्ती सोशल मीडिया यूजर्सनाही फार आवडली आहे. चीनमधील एका मेट्रो स्टेशनमधील ही घटना आहे.
हा तरुण आता मेट्रोच्या सीटवर अवलंबून नाही. त्यामुळे आता तो रोज आरामात प्रवास करतोय. तो स्वत:चा सोफा घेऊन रोज मेट्रोमध्ये जातो आणि तो जागा मिळेल तिथे सोफा ठेऊन बसतो. मग आरामात त्यावर बसून तो प्रवासाचा आनंद लुटतोय. यासाठी त्याने मेट्रो प्राधिकरणाचीही परवानगी दिली आहे.
हा तरुण मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर स्वत:चा सोफा घेऊन बसलेला दिसत आहे. तो रोज सिंगल सोफा खांद्यावर उचलून स्टेशनवर आणतो आणि त्यावर बसलो, त्याचे फोटो चिनी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
मिररच्या रिपोर्टनुसार, ही घटना हांगझोऊ मेट्रो लाइन -२ ची आहे. जिथे मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश करताना एक तरुण बॅकपॉकसारखा खांद्यावर सिंगल सीटर सोफा घेऊन जाताना दिसला, त्याला पाहून प्रवाशांसह मेट्रोचे कर्मचारीही आश्चर्यचकित झाले आहेत.
हा व्यक्ती रोज घरातून रोज सोफा घेऊन येतो आणि स्टेशनवर त्या सोफ्यावर बसून मेट्रोची वाट पाहतो, नंतर मेट्रोच्या आतही सोफा टाकून त्यावर बसतो. ट्विटवर @NoticiasRNN या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
स्थानिक मीडियाशी बोलताना या व्यक्तीने सांगितले की, अनेकदा मेट्रोमध्ये सीट मिळत नसल्याने त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे त्याने एक विशेष प्रकारचा सोफा तयार केला आहे.
हा सोफा इकडून -तिकडे सहज हलवता येईल, यापूर्वी त्याने पोर्टेबल खुर्ची बनवण्याचा विचार केला होता, पण ऑफिसमध्येही त्याच प्रकारच्या खुर्च्यांवर बसून त्याला कंटाळा आला होता. म्हणूनच शेवटी त्याने सोफा बनवण्याचा निर्णय घेतला. त्या व्यक्तीने सांगितले की, आता तो मेट्रो आणि ट्रेनमध्ये आरामात प्रवास करतो आणि इतर सर्व प्रवासी त्याच्याभोवती उभे असतात.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.