6 मुली आणि एक सहा महिन्याच्या मुलगा आहे, पती आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी दारोदारी भटकतोय.
भरतपूर (राजस्थान):- जिल्ह्यात प्रेमप्रकरणाची अनोखी घटना समोर आली आहे. येथे सात मुलांची आई एका 20 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की ती आपला पती आणि सात मुलांना सोडून प्रियकरासह पळून गेली.या महिलेचा सर्वात लहान मुलगा सहा महिन्यांचा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलेचा प्रियकर दुसरा कोणी नसून तिच्या पतीचाच मित्र आहे. याप्रकरणी आता महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात न्यायालयामार्फत गुन्हा दाखल केला आहे.
भरतपूरच्या उद्योग नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना समोर आला आहे. पतीने मुलांसह पोलीस ठाणे गाठून न्यायाची मागणी केली. महिलेचा पती पीताम त्याची सात मुले आणि पत्नी सुनीता यांच्यासह रारह गावात भाड्याने घर घेऊन राहतो. त्याचा एक मित्र महेश त्याच्याकडे काम करायचा. पीतम सांगतो की, त्याच दरम्यान त्याच्या पत्नीचे महेशसोबत अफेअर होते. त्यानंतर त्याची पत्नी मुलांना सोडून पळून गेली.
दोघेही जवळपास दोन महिन्यांपासून फरार आहेत. या दोघांचाही ठावठिकाणा अद्यापपर्यंत सापडलेला नाही. त्याच्या पत्नीला परत आणले पाहिजे. आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी तो दारोदारी भटकत आहे. पीतम हा मजूर म्हणून काम करतो. सध्या तो आपल्या मुलांची काळजी घेत आहे. पीतम यांना 6 मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा आता फक्त सहा महिन्यांचा आहे. मात्र सुनीताने त्याचीही पर्वा न करता प्रियकरासह पळ काढला.
राजस्थानमध्ये अशा प्रकारच्या प्रेमप्रकरणाची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी जावई त्याच्या सासूसोबत सिरोही येथे पळून गेला होता आणि बुंदीमध्ये सासरे आपल्या सुनेसह पळून गेले होते. यानंतर आता पीतमनेही मदत मागितली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.