स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एका आईने अचानकपणे उचलले मोठे पाऊल आपल्या दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने स्वत: लाही संपवलं.

Spread the love

यवतमाळ :- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात निगनूर येथे धक्कादायक तसेच मनाला चटका लावणारी घटना घडली. एका आईने आपल्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेत आपले जीवन संपवले.
तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेलले नाही. रेश्मा नितीन मुडे (वय २८)असे आईचे मृत्यूमुखी पडलेल्या आईचे नाव आहे तर श्रावणी नितीन मुडे (वय ६) आणि सार्थक नितीन मुडे (वय ३) असे मृत चिमुकल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळच्या सुमारास रेश्मा मुडे यांनी आधी दोन बालकांना विष पाजले. यानंतर त्यांनी स्वतःही विष प्राशन केले. त्यांची प्रकृती खराब झाल्यावर कुटुंबातील सदस्यांना ही बाब लक्षात आली. त्यावेळी त्यांनी तातडीने रेश्मा, सार्थक आणि श्रावणी या तिघांनाही तातडीने सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या आधीच दोघांचा मृत्यू झाला होता. तर श्रावणीला पुढील उपचारासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान तिचाही मृत्यू झाला.

दरम्यान, रेशमाने अचानकपणे येवढे मोठे पाऊल का उचलले आणि आत्महत्या का केली? हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी महागाव पोलीस ठाण्यात आई रेश्मा नितीन मुडे आणि सार्थक मुंडे, यांच्या मृत्यूप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर श्रावणीचा मृत्यू पुसद येथील दवाखान्यात झाला त्यामुळे तिचा मृत्यूची नोंद पुसद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार