खळबळजनक : पिंप्रीत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न; धरणगाव पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे सर

पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारी गावात दोन जण ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.

या संदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दोन तरुण दुपारच्या सुमारास आलेत. त्यांनी वेगवेगळ्या दुकानांवर जात त्यांच्याकडील ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. दुकानदारांना मात्र, ५०० ची नोट बनावट असल्याचे लागलीच लक्षात आले. त्यामुळे बापूसाहेब गोपाल चौधरी व नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पो.नि. उद्धव ढमाले यांनी आपले एक पथक पिंप्रीला रवाना केले. त्यात बीट हवालदार मोती पवार, पोकॉ उमेश पाटील, समाधान भागवत, राजू पाटील यांचा समावेश होता.

या पथकाने बराच वेळ बाजारात त्यांचा मागोवा घेतला. एका दुकानावर अखेर दोघं सापडले. चौकशीत प्रवीण नंदलाल जैस्वाल (खंडवा) आणि राधेशाम शरद जाखेटे (जळगाव), असे संशयित आरोपींचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दोघंही जण १०, २० रुपयांची वस्तू घेऊन ५०० रुपयांचे सुटे घेत होते. मात्र, दुकानदारांच्या लक्षात हा प्रकार आल्याने ते अडकले.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयितांना धरणगाव पोलीसा स्थानकात आणण्याते आले होते आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दोघांकडे अडीच ते तीन हजाराच्या बनावट नोटा मिळून आल्याचे देखील कळते.संशयित पिंप्री ग्रामपंचायत ने लावलेल्या सी सी टीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहेत.

  • बाजारात बनावट नोटा चलनात येणे ही गंभीर बाब आहे. सर्वसामान्य नागरिकांनी , लहान ,मोठे व्यापारी बांधव यांनी जागृत राहून वेळीच सावधगिरी बाळगावी.
  • बापूसाहेब गोपाल चौधरी (मा. जि प सदस्य पिंप्री – सोनवद गट)

हे वाचलंत का ?

टीम झुंजार