धरणगाव तालुका गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
धरणगाव प्रतिनिधी / सतीश शिंदे सर
धरणगाव :- पिंप्री खु येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडिअम स्कूल , आदर्श बालक ,प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पिंप्री गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी केलेली विविध महापुरुषांची वेशभूषा ही नागरिकांना लक्षवेधी ठरली .
धरणगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले .
स्वातंत्र्य दिनाच्या उत्सव प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली . तसेच शिक्षक मनोगतात कविता चौधरी , व विशाल सपकाळे यांनी आपल्या मनोगतातून देशाला अपेक्षित कार्य यावर सखोल माहिती दिली .जि प केंद्र शाळा पिंप्री चे केंद्रप्रमुख श्री प्रमोद पाटील सर यांनी आपल्या संबोधनमधुन स्वातंत्र्य , नवं भारत , विद्यार्थी हित यावर माहिती दिली . कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ भावना भोसले मॅडम यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत , देशासाठी शाहिद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. तसेच ‘ निपुण ‘ साठी येत्या काळात शिक्षणाच्या माध्यमातून जास्तीतजास्त साक्षरता रुजवण्यासाठी प्रयत्नवादी असले पाहिजे यावर प्रकाशझोत टाकला.
प्रसंगी विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गंगाराम नंनवरे यांच्याकडून विद्यालयास जळगाव जिल्हा माहिती पुस्तिका भेट स्वरूपात देण्यात आली.
यावेळी संस्थेच्या संचालिका यशोदा मधुकर चौधरी , उपाध्यक्ष प्रमोद चौधरी , सचिव विनोद चौधरी सर आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सॊ वैशाली चौधरी , आदी उपस्थित होते .स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मनोगत ,देशभक्ती गीत गायन व नृत्य , मानवी मनोरे , लेझीम पथक , आदी माध्यमातून मनमोहक कलाकृती सादर केल्या .यावेळी पालक , विविध क्षेत्रातील पदाधिकारी , नवयुक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चारही युनिट चे मुख्याध्यापक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
सूत्रसंचालन एस के शिंदे यांनी केले तर आभार आर एस पाटील यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले