Proper Time For Lunch: रात्रीचे जेवण संध्याकाळी ७ वाजेच्या आसपास घ्यावे, ही माहिती जवळपास सगळ्यांनाच आहे. पण दुपारच्या जेवणाची अशी कुठली वेळ आहे? वाचा सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी याबाबत दिलेली महत्त्वाची माहिती.
रात्रीचे जेवण घेण्याची आदर्श वेळ कोणती? रात्रीच्या जेवणात आणि झोपेमध्ये किती तासांचे अंतर असावे, अशी सगळी माहिती बऱ्याच जणांना असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणाबाबत ज्यांना शक्य असते ते बरेच जण काटेकोर असतात. पण दुपारच्या जेवणाची अशी योग्य वेळ कोणती, याचा अंदाज मात्र अनेकांना नाही. दुपारच्या जेवणाच्या बाबतीतही वेळा पाळल्या तर ॲसिडिटी होणे, सुस्ती येणे, संध्याकाळच्या वेळेस अंग जड पडणे, रात्री जेवणाची इच्छा न होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे (Delayed lunch causing acidity, headache and gas) असे त्रास होत नाहीत. म्हणूनच दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती आणि जर जेवायला उशीर होत असेल तर त्या वेळेत नेमकं काय करावं (remedies for acidity), याविषयी ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी दिलेली ही विशेष माहिती एकदा वाचा.

ऋजुता यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणतात की दुपारच्या जेवणाची आदर्श वेळ स. ११ ते दु. १ यादरम्यान आहे. यावेळेत जर आपण जेवलो तर वर सांगितलेले कोणतेही त्रास सहसा होत नाहीत.
कामामुळे बऱ्याच जणांना ही वेळ पाळणं शक्य नसतं. असं झाल्यास काय करावे याचे त्यांनी सांगितलेले ३ उपाय पुढीलप्रमाणे…
दुपारचं जेवण लांबल्यास काय उपाय करावे?

१. शक्यतो स. ११ ते दु. १ या दरम्यानच जेवायला बसण्याचा प्रयत्न करा. पण ते नाहीच जमलं तर या वेळेदरम्यान एका जागी शांतपणे बसा आणि एक क्लास पाणी सावकाश प्या. पाणी पिताना धावपळ गडबड टाळा.
२. दुसरा उपाय म्हणजे एखादं मगजदार फळ खा. उदाहरणार्थ केळी, सिताफळ, पपई, चिकू, सफरचंद अशी फळं तुम्ही खाऊ शकता.
३. दुपारचं जेवण उशीरा झाल्यास जेवणाचा शेवट एक चमचा गूळ आणि तूप एकत्रितपणे खाऊन करा. असे केल्याने ॲसिडिटीचा त्रास होणार नाही, डोकं जड पडून सुस्ती येणार नाही.
हे वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.