जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. मन:स्वाथ्य कायम ठेवून कार्य करावे. आततायीपणे वागून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देऊ नका. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल.
वृषभ :-
खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मित्रांकडून अनपेक्षित टोला बसू शकतो. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. जुने ग्रंथ हाताळले जातील. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका.
मिथुन :-
स्वत:च्या विचारांना स्थिर ठेवा. जोडीदाराचा सल्ला ऐकावा. जुन्या मित्रांशी भेटीचा अथवा फोनवरून संपर्क होण्याची शक्यता. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. आपल्या योजना गुप्त ठेवाल.
कर्क :-
घरातील जबाबदारी पेलताना दमणूक होईल. आहारात पथ्ये पाळावीत. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य घ्यावे. कार्यक्षेत्रात परिवर्तन घडून येईल.
सिंह :-
नवीन कार्याला चालना मिळेल. तुमच्या शब्दाला मान लाभेल. बौद्धिक चुणूक दाखवाल. आपल्याच मतावर ठाम राहाल. दिवस आनंदात जाईल.
कन्या :-
घरातील बरीच कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. मनातील निराशा दूर करावी. तुमच्यातील कलेला कौतुकाची थाप मिळेल. क्षुल्लक अपेक्षाभंगाने खचून जाऊ नका.
तूळ :-
हातून चांगले काम होईल. घरामध्ये शांत राहावे. महत्त्वाचे निर्णय गांभीर्याने घ्यावेत. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. कामाची नवीन जबाबदारी अंगावर पडेल.
वृश्चिक :-
कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. देणी फेडता येतील. तुमच्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल.
धनू :-
हातून चांगली कामे होतील. गरज नसेल तर खर्च टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल. नियोजनाने कामे सुलभ होतील.
मकर :-
अति विचार करू नका. धार्मिक गोष्टीत मन रमवावे. कौटुंबिक गोष्टी सबुरीने घ्याव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मुलांबरोबर संवाद साधावा.
कुंभ :-
मुलांबरोबर खेळ खेळावेत. प्रेमसंबंध अधिक दृढ करावेत. ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे. भावंडांशी संवाद साधावा. कामाचा जोम वाढेल.
मीन :-
घरातील वातावरण शांततामय ठेवा. अधिकार बेताचाच वापरा. बोलताना तोल जाणार नाही याची काळजी घ्या. कामाचा विस्तार वाढवण्याचे ठरवाल. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






