अमळनेर तालुक्यात विहिरीत पडून 17 वर्षीय तरूणांना मृत्यू, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे रेल्वे प्रवासात मदत व बचाव कार्याचे आदेश

Spread the love

जळगाव : – अमळनेर तालुक्यात विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरूणांचा मृतदेह एसडीआरएफ पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नानी शोधून काढला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शोध व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पारोळा येथील वंजारी शिवारालगत रहिवाशी असलेले विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे (वय १७) हा शिक्षणाकामी अमळनेर येथे राहत होता. प्रताप महाविद्यालय इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होता. त्याच्यासोबत चार पाच मित्रांसह तो विहिरीत पोहायला गेला होता. विहीरीत उडी मारल्यावर तो वर आला नाही. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर ही घटना स्थानिकांनी तात्काळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या कानावर टाकली.

मंत्री श्री. पाटील यांनी रेल्वे प्रवासात सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी व एसडीआरफचे राज्य संचालक यांना मदत व बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले होते.

एमडीआरएफ ने स्थानिक आदिवासींच्या तरूणांच्या मदतीनं मृतदेह शोधून काढला आहे. पुनवर्सन मंत्र्यांनी तरुणांच्या कुटुंबाचे दूरध्वनीवरून सांत्वन केले आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार