स्वेच्छानिवृत्ती घेवून व्यवसाय सुरू केला, शेतीची खरेदी करून आले अन् सायंकाळी २९ वर्षीय विवाहित युवकाने संपविले जीवन.

Spread the love

प्रतिनिधी | अमळनेर.

येथून जवळच असलेल्या भिलाली येथील २९ वर्षीय विवाहित युवकाने काल सायंकाळी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनातूनच निवृत्ती घेतली , दीपक कोमलसिंग गिरासे असे मृत तरुणाचे नाव आहे , आत्महत्येचे कारणमात्र स्पष्ट झाले नाही

घरी तोडकी शेतीत उदरनिर्वाह होणार नाही म्हणून नाशिक येथे खाजगी कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळाली , त्यातही चित्त रमले नाही ,स्वेच्छा निवृत्ती घेऊन शेतीही घ्यायची व स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असे म्हणून पती पत्नीने नाशिक येथे चहा आणि वडापावचा व्यवसाय सुरू केला , तशात स्वेच्छा निवृत्तीच्या रकमेतून शेतीचा व्यवहार ठरला व त्या शेतीची शिंदखेडा येथे सोमवारी खरेदी करून घरी चार वाजता आल्यावर शेवटच्या खोलीत झोपून गेल्यावर आई खळ्यात गेल्याचे पाहून दीपक गिरासे याने पुढच्या खोलीतील स्लॅबच्या कडील साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घरच्यानी सायंकाळी ६ वाजता खोलीत पाहिले असता दीपक कोमलसिंग गिरासे याने गळफास घेऊन

आत्महत्या केल्याचे दिसून येताच शेजारच्या लोकांनी त्यास खाली उतरून अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले , मृत दीपक गिरासे याच्या पश्चात्य आई वडील पत्नी ,एक बहीण दोन मुले असा परिवार आहे , त्याच्यावर आज सकाळी ११ वाजता भिलाली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे , याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे , पुढील तपास हवालदार सचिन निकम हे करीत आहेत

हे पण वाचा

टीम झुंजार