Viral Video: उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याच्या मच्छली शहराच्या रसूलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील सहा पुरुषांनी एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून पळवून नेत तिच्यावर ऑन कॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे.
पीडित मुलीने आरडाओरड करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या भयावह व्हिडीओमध्ये चार पुरुष अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करताना दिसत आहे. तर पीडित तरुणी स्वत:चा बचाव करत आहे. तरीही आरोपी जबरदस्ती करत तिच्या अंगाशी झटत आहेत. पीडितेनं आरोपींचा प्रतिकार केला असता आरोपींनी तिचे हात मुरडत तिच्यावर शारीरिक हल्ला केला.
यानंतर पीडित मुलीने आरडाओरडा करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी एक आरोपी ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद करत होता. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मुलीचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक मदतीला धावून येतील या भीतीने सहाही आरोपींनी घटनास्थळावरून फरार झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रसूलाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.