जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
कलात्मक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चर्चा कराल. जुन्या आठवणींनी मनाला समाधान मिळेल. खर्चासाठी हात आवरता घ्यावा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.
वृषभ :-
बोलण्यातून समोरच्यांची मने जिंकाल. हातातील कामात खंड पडू देऊ नका. घरातील कामांची जबाबदारी वाढेल. मनात उगाच शंका आणू नका. आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका..
मिथुन :-
आपल्या निर्णयावर ठाम राहावे. लोकांशी वैयक्तिक संपर्क टाळावा. आवडीच्या गोष्टी करण्यात अधिक रमून जाल. अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.
कर्क :-
सर्वांशी आपुलकीने वागा. बाहेरील लोकांना भेटणे टाळा. जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा. प्रिय व्यक्तीची भेट होईल. हौसेवर पैसे खर्च कराल.
सिंह :-
मित्रांशी गप्पा रंगतील. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. मनातील खिन्नता काढून टाकावी. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या कामाची शाबासकी मिळेल.
कन्या :-
घरातील वातावरण आनंद देऊन जाईल. वरिष्ठांशी शांतपणे वागा. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. विनाकारण कुणाच्या मदतीला धावू नका. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या.
तूळ :-
उत्तम वाचनाचा आनंद घ्याल. तिखट पदार्थ टाळा. भावंडांसाठी पैसा खर्च होईल. एखादी नवीन योजना सुचेल. शांत राहून मानसिक स्वास्थ्य अनुभवा.
वृश्चिक :-
मुलांवरील खर्च वाढेल. आपल्या बोलण्यातून कोणी दुखवणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार जपून वापरा. वादाचे प्रसंग टाळावेत. संपर्कातील लोकांशी फटकून वागू नका.
धनू :-
समोरच्याचे शांतपणे ऐकून घ्यावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आर्थिक बाबतीत उत्तम दिवस. आहारावर नियंत्रण हवे. उत्साहाच्या भरात अनाठायी खर्च वाढू शकतो.
मकर :-
छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. इतरांच्या कामात दिवस घालवाल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. उदात्त दृष्टीकोन ठेवाल. दुसर्यांच्या मदतीला धावून जाल.
कुंभ :-
निरूत्साह झटकून कामाला लागा. घरातील कामे मार्गी लावा. जुन्या गोष्टींबाबत मनात संभ्रम बाळगू नका. धाडस दाखवताना सारासार विचार करावा. समस्यांचे निराकरण करता येईल.
मीन :-
स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बाळगा. अचानक येणार्या खर्चावर नियंत्रण ठेवा. अति तिखट पदार्थ कमी खा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांना वेळ द्यावा
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






