भुसावळ : – तालुक्यातील वरणगाव शहरातील खिडकी मोहल्ला परिसरात राहणारा तरुण आपल्या मिर्जा स्टील च्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि १५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की खिडकी मोहल्ला परिसरात राहणारा शाहीद अलताफ बेग ( मिर्जा ) (३०) हा दि १४ ऑगस्ट रोजी बस चौकात भोगा ( हुट्टर ) बसविण्याचे काम करुन सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील मिर्जा स्टील व फर्निचरच्या दुकानाकडे निघुन गेला .
त्या नंतर मात्र तो कुणालाच भेटला नाही किंवा दिसला नाही रात्री उशिरा पर्यत घरी नआल्याने त्याची आई व लहान भावाने त्याला भ्रमणध्वनी वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याना कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही कुठेतरी काम करीत असेल सकाळी घरी येईल असे घराच्याना वाटले. दुसऱ्या दिवसी १५ ऑगस्ट रोजी बारा वाजले . परंतु भाऊ घरी आला नसल्याने त्याचा लहान भाऊ त्याला शोधत शोधत दुकानाकडे आला व बंद दुकानाचे शटर उघडताच शाहीदने आपल्याच दुकानाच्या छताला सुताच्या दोरी बांधून गळ्याला गळफास लावून आत्महत्या त्याच्या नजरेस पडल्याने हि घटना उघडकीस आली.
याबाबत शे मोबीन शे सखावत याच्या खबरीनुसार अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ नागेंद्र तायडे हे करीत आहे
मयत शाहीद याच्या पश्च्यात पत्नी , तीन मुल , आई , वडिल , भाऊ असा परिवार असुन तो मनमिळावू स्वभावाचा असल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र समजू शकले नाही.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.